Homemuktainagarमुक्ताईनगर शहरात तांदळाचा अवैध व्यवसाय बळावला; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

मुक्ताईनगर शहरात तांदळाचा अवैध व्यवसाय बळावला; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

-

मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरात तांदळाचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शासकीय परवानगी नसताना तसेच अन्नधान्य साठवणूक व विक्रीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करून काही व्यापाऱ्यांकडून खुलेआम तांदळाची खरेदी-विक्री सुरू असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तांदळाची साठवणूक करण्यात येत असून, त्याची कोणतीही अधिकृत नोंद अथवा परवाना उपलब्ध नाही. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) तांदूळ काळ्या बाजारात विक्रीस जात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग, महसूल प्रशासन तसेच पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वारंवार तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

अवैध तांदूळ व्यवसायामुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, गरजू नागरिकांच्या हक्काच्या रेशनवर गदा येत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ तपास पथक नेमून अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मुक्ताईनगर शहरातील नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस येऊनही प्रशासन मौन बाळगणार की कारवाई करून नागरिकांचा विश्वास जपणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Atiq Bilal Khan
Atiq Bilal Khanhttps://viralnewslive.in/
Atiq Bilal Khan is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here.Name: Atiq Bilal Khan Designation: Khandesh Divisional Editor Location: Seed Farm, Muktainagar, District Jalgaon (Khandesh) Phone: 9325146187

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts