राष्ट्रीय अर्थसाह्य योजनेअंतर्गत निराधार विधवा महिलांना तात्काळ आर्थिक अनुदान द्या अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी निराधार विधवा महिलांसह तहसील कार्यालयासमोर शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे)आमरण उपोषणाचा इशारा

Advertisement

मलकापुर:- दारिद्र्य रेषेखालील घरातील कर्ता पुरुषाचे निधन झाल्यामुळे शासनाच्या वतीने विधवा निराधार महिलांना राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेसाठी आर्थिक मदत म्हणून 20,000 रुपयाचे अनुदान देण्यात येते. मात्र गेल्या वर्षभरापासून या योजनेतील 31 निराधार विधवा लाभार्थी महिला अनुदानापासून वंचित असल्याने त्यांचे कुटुंबीयावर उपासमारीची पाळी आलेली आहे याबाबत आज दि.7 जानेवारी 26 रोजी शिवसेना (उद्धव ठाकरे) सेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात एक निवेदन तहसीलदार समाधान सोनवणे यांना देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की निराधार विधवा महिलांना राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत म्हणून 20,000 रुपयांचे अनुदान गेल्या वर्षभरापासून देण्यात आले नाही निराधार लाभार्थी विधवा महिला तहसील कार्यालयात चकरा मारून हैराण असून निराधार विधवा महिलांनी याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना देताच त्यांनी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर निराधार विधवा महिलांना पंधरा दिवसाचे आत तात्काळ अनुदान द्यावे अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 25 जानेवारी 26 पासून सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर निराधार विधवा महिलांसोबत, शिवसेना पदाधिकारी आमरण उपोषण करतील त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदद्वारे तहसिलदार समाधान सोनवणे यांना देण्यात आला आहे.निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, शिवसेना नगरसेवक रफीकभाई बर्तनवाले,उपशहर प्रमुख शकील जमादार, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै. रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, युवासेना शहर प्रमुख मंगेश सातव, ॲड सुनील इंगळे,शेख रफिक शेख नबी, सत्तार शाह,शेख मोहसीन शेख छोटू सह आदिंची उपस्थिती होती.

Subscribe to Viral News Live