मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई.

Advertisement

मुक्ताईनगर….
तालुक्यामध्ये अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत 16 हजाराचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा, चांगदेव, घोडसगाव , सुकळी शिवारामध्ये अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दिगंबर घोपे हरताळा, प्रकाश बोदडे चांगदेव, सुभाष भलभले घोडसगाव, अरुण कवरे सुकळी, विलास नावकर घोडसगाव, भालचंद निकम हरताळा, श्रावण वानखेडे चांगदेव यांचे विरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत बोदडे, विजय पढार ,दीपक ढाकरे ,श्रीकृष्ण देशमुख, अजय खंडेराव ,गोविंदा सुरवाडे , संजय पवार यांच्या पथकाने कारवाई केली होती.

Subscribe to Viral News Live