Homebuldhanaजि.प.उर्दू शाळा ते शेख उस्मान यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याची मागणी; ५० नागरिकांचे...

जि.प.उर्दू शाळा ते शेख उस्मान यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याची मागणी; ५० नागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेदन

-

  • जि.प.उर्दू शाळा ते शेख उस्मान यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याची मागणी; ५० नागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेद

पावसाळ्यात चिखलामुळे विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास; विशेष बाब म्हणून रस्ता मंजूर करण्याची मागणी

उदयनगर : उदयनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषद उर्दू शाळा ते शेख उस्मान शेख रहेमान यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तातडीने मंजूर करून बांधण्यात यावा, अशी मागणी वार्ड क्रमांक १, २ व ३ मधील नागरिकांनी आज दि.३० जून रोजी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद उर्दू शाळेत सुमारे ३०० विद्यार्थ्यांची पटसंख्या असून शाळेत ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा नागरिक व विद्यार्थी घसरून पडल्याने जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता व नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण विशेष बाब म्हणून तात्काळ मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर शेख रफिक, शेख बशीर, जावेद खान, यास्मिन बी, शेख अख्तर यांच्यासह वार्ड क्रमांक १, २ व ३ मधील सुमारे ५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन सादर करताना माजी सरपंच प्रदीप अंभोरे, पुरुषोत्तम अवचार, राधेश्याम ठाकरे, अनिल अंभोरे, शेख इल्यास, सलीम भाई आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन संबंधित रस्त्याचे काम तातडीने मंजूर करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts