Homemuktainagarमुक्ताईनगर येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त २५ परिचारिका व परिचारकांचा गौरव 

मुक्ताईनगर येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त २५ परिचारिका व परिचारकांचा गौरव 

-

मुक्ताईनगर प्रतिनिधी…….डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघ व योगमाया प्रतिष्ठान, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त विशेष कृतज्ञता व सन्मान सोहळ्याचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल एकूण २५ परिचारिका व परिचारकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.अथक सेवेचा सन्मानरुग्णसेवेलाच ईश्वरसेवा मानून अहोरात्र कष्ट करणाऱ्या परिचारिकांच्या कार्याचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कोरोना काळापासून ते आजतागायत सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्यदूतांना यावेळी सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या सन्मानचिन्ह देऊन २५ परिचारिका व परिचारकांचा गौरव करण्यात आला डॉ.मनोज महाजन यांनी बोलताना म्हणाले की, डॉ.उपचाराला परिचारिकांच्या मायेच्या आणि तत्पर सेवेची जोड मिळाल्याशिवाय रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. त्यांचे हे योगदान समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे.उत्साही वातावरणात सोहळ्याला मुक्ताईनगर परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सन्मानित झालेल्या परिचारिकांनी या उपक्रमाबद्दल दोन्ही संस्थांचे मनापासून आभार मानले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुक्ताईनगर तालुका संघचालक डॉ. मनोज महाजन उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे ,श्रीमती आशाताई चिखलकर,योगमाया प्रतिष्ठान मुक्ताईनगर चे संस्थापक अध्यक्ष अश्विन सुरवाडे आदी उपस्थित होते. वृषभ जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल कोळी, यश शिरतुरे , विशाल तेलंग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघाचे पदाधिकारी तसेच योगमाया प्रतिष्ठान मुक्ताईनगर चे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts