मुक्ताईनगर तहसील कार्यालयात अन्नसुरक्षा व पुरवठा विभागाची आढावा बैठक संपन्न !
मुक्ताईनगर,तहसील कार्यालय येथे अन्नसुरक्षा व पुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत मुक्ताईनगर तालुक्यातील शासन मान्य रास्त भाव दुकाने (रेशन दुकानदार),रेशन कार्डधारक लाभार्थी यांना मिळणाऱ्या धान्याच्या वितरणाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
‘तालुक्यातील शासकीय धान्य गोदामातून रास्त भाव दुकानांपर्यंत होणारा पुरवठा,तसेच लाभार्थ्यांना नियमानुसार व पूर्ण प्रमाणात धान्य मिळत आहे की नाही,याबाबत विविध तक्रारी समोर आल्या.काही ठिकाणी प्रति क्विंटल धान्यापाठीमागे १ ते २ किलो कमी धान्य मिळत असल्याच्या, तसेच लाभार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात धान्य दिले जात असल्याच्या तक्रारी उपस्थित करण्यात आल्या.तसेच रेशन लाभार्थ्यांच्या याद्या अद्ययावत नसणे, वितरणातील अनियमितता, वेळेवर धान्य न मिळणे अशा विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
‘या आढावा बैठकीस मुक्ताईनगर तहसीलदार श्री.वखारे साहेब, तहसीलदार श्री.वाढे, उपविभागीय अधिकारी श्री.जितेंद्र पाटील साहेब, शिवसेना विनोदभाऊ तराळ,शिवसेना जिल्हा संघटक श्री.सुनील पाटील,शिवसेना अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष श्री.अफसर खान यांच्यासह रेशन दुकानदार व नागरिक उपस्थित होते.






