५३वे बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलचा प्रथम क्रमांक

५३वे बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलचा प्रथम क्रमांक
५३वे बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलचा प्रथम क्रमांक
Advertisement

मलकापूर : विवेकानंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज हिवरा आश्रम येथे आयोजित बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविला. जिल्ह्यातील विविध शाळांनी विज्ञान विषयातील विविध मॉडेल्स, नवकल्पना आणि प्रयोग सादर केले असताना नूतन इंग्लिश स्कूलच्या कु. गार्गी सागर शिकेतोड व कु ख़ुशी खानचंदानी यांनी सादर केलेले “प्लास्टिक पायरोलिसिस” हे मॉडेल नावीन्यपूर्ण, उपयुक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणारे ठरले.शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पाने नावीन्यपूर्ण संकल्पना, संशोधनात्मक मांडणी व प्रत्यक्ष उपयोगिता यामुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, पर्यावरणपूरक विचार आणि सामाजिक उपयुक्तता प्रभावीपणे मांडण्यात आली होती.
या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम, मार्गदर्शक शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन तसेच शाळा व्यवस्थापनाचे सततचे प्रोत्साहन कारणीभूत ठरले आहे
या यशामुळे लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष श्री. डी.एन.पाटील, सचिव डॉ.अरविंद कोलते, तसेच सर्व संचालक मंडळ,नूतन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री.सुरेश खर्चे सर,उपप्राचार्य अमोल चोपडे सर,प्रदीप कोलते सर व विज्ञान शिक्षक श्री.अमोघ घाटे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी , सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मिशन परिवर्तन अंतर्गत गांजा जप्ती की बड़ी कार्रवाई

Advertisement

फरार मुख्य सूत्रधार अमोल राजपूत अटक

Subscribe to Viral News Live