मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील बाबा रामदेव ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक मधील टायर ट्यूब असे साहित्य असे दोन लाखाचे साहित्य अपहार केल्याची घटना 15 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान घडली असून याप्रकरणी एका विरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फिर्यादी- अक्षीत विनयकुमार पांडे, वय 30 वर्षे, धंदा-खाजगी नोकरी (डेप्टी मॅनेजर संधु ट्रान्स लॉजेस्टीक इंडिया प्रा. लि.) रा. नविन दिल्ली व आरोपी-. अमितसिंग विरंदरसिंग, वय-45 वर्षे, रा. भगवानदिन का पुरबा, घुराडीह, अमावा रायबरेली (उत्तर प्रदेश),
दिनांक-15/11/2025 रोजी दुपारी 04.00 वाजेच्या सुमारास ते दि-18/12/2025 वाजेचे रात्रीचे 22.30 वाजता चे दरम्यान बाबा रामदेव ढाबा घोडसगांव ता. मुक्ताईनगर येथे कारण- स्वताचे आर्थीक फायद्यासाठी अपहार केला .
गेला माल-1) 1,91,360/- रु. किंमतीचे 14 ट्रक टायर, 2)11494/- रु. किंमतीचे 14 फ्लॅप, 3)4186/- रु. किंमतीचे 14 ट्युब असे एकुण 2,07,040/-रुपये
खुलासा- फिर्यादी चि फिर्याद की, वरील ता. वेळी व ठिकाणी आरोपी मजकुर हा संधु ट्रान्सफर कंपनीने मधे चालक म्हणुन कामस आहे. कंपनीने आरोपीतास विश्वासाने कंटेनर कं. NL 01 AJ 8685 मधुन ऑर्डर प्रमाणे अपोलो कंपनीचे 399 टायर व फ्लॅप, टुब असा एकुण-69,91,997/- रुपयाचा माल चेन्नई येथुन इंदौर पोहचविण्या करिता विश्वासाने त्याचे ताब्यात दिले असता. आरोपीताने रस्त्यामधे प्रवासा दरम्यान वरिल नमुद मलातुन 14 ट्रक टायर, 14 फ्लॅप, 14टुब असे एकुण-2,07,040/- रुपये किंमतीचा मालाचा अपहार करून त्याचे ताब्यातील वरिल नमुद कंटेनर रामदेव ढाबा घोडसगांव ता. मुक्ताईनगर येथे ढाब्याच्या आवारात उभे करुन निघुन गेला आहे म्हणुन गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजय खंडेराव करीत आहे.





