
मलकापूर : २१/१२/२०२५ | Viral News Live
मलकापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर झाला असून नगराध्यक्षपदावर काँग्रेसचे उमेदवार अतिक उर-रहमान जवारीवाले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद महादेवराव डवले यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या निवडणुकीच्या निकालामुळे मलकापूरच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळाली असून शहराच्या सत्तासमीकरणात लक्षणीय बदल झाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अधिकृत मतमोजणीनुसार काँग्रेसचे अतिक जवारीवाले यांना एकूण २३,६१४ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार मिलिंद डवले यांना १२,६३० मते प्राप्त झाली. या विजयामुळे काँग्रेसने नगराध्यक्षपदावर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. इतर उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रसाद नारायणराव जाधव यांना ४,५१५ मते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अनिल त्रंबक झोपे यांना २७४ मते, कमरान बी. शेख बशीर यांना ११५, अरविंद जानकीराम पाटील यांना २५९, आशिष माहूरकर यांना ७५, गजानन परशुराम मिरगे यांना ७८८, सय्यद अजगर रहमान यांना ४६, तर अ. समद अ. नजीर यांना १३३ मते मिळाली. नोटा पर्यायाला २५० मतदारांनी पसंती दर्शवली.
नगरपरिषदेच्या एकूण रचनेतही काँग्रेसचा स्पष्ट प्रभाव दिसून आला आहे. एकूण ३० वॉर्डांपैकी काँग्रेसचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ४, एमआयएमचे ३, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चा १ तर २ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे नगरपरिषदेतील सत्तासंतुलन काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.
विविध प्रभागांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग १ (अ) मधून डोफे मंगला महादेव (घड्याळ) ९४३ मते, प्रभाग १ (ब) मधून राजापुरे दुर्गेश राजेंद्र (कमळ) १८०६ मते, प्रभाग २ (अ) रिंढे हेमंत राजेश (कमळ) १३७९ मते, प्रभाग २ (ब) जाधव उर्मिलाबाई विजयराव (कमळ) १४७८ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ३ (अ) पाचपांडे मिनाक्षी मोहन (हात) ७८१, प्रभाग ३ (ब) गांधी अनिल शिवरतन (हात) १३१४, प्रभाग ४ (अ) चव्हाण अ. हबीब अ. सत्तार (घड्याळ) १०७४, प्रभाग ४ (ब) अग्रवाल सुनिता अरुण (घड्याळ) १३५० मते मिळाली.
प्रभाग ५ (अ) शमा बानो सैय्यद सलीम कुरेशी (हात) १५८६, प्रभाग ५ (ब) कुरैशी अब्दुल मजीद अब्दुल कदीर (घड्याळ) १४६२, प्रभाग ६ (अ) रुकय्या खालिक अहमद, प्रभाग ६ (ब) रईस खा रशीद खा जमादार (हात) १७२७ मते घेऊन विजयी झाले. प्रभाग ७ (अ) सायमा खानम जमील खान जमादार (हात) १५३२, प्रभाग ७ (ब) रशीद खान युसुफ खान (हात) २१५४, प्रभाग ८ (अ) असमत अंजुम अब्दुल कहार (पतंग) १७४०, प्रभाग ८ (ब) शेख इमरान शेख गुलाब (पतंग) १५५१ मते मिळाली.
तसेच प्रभाग ९ (अ) शकीला बी असतउल्लाशाह (पतंग) १२००, प्रभाग ९ (ब) सायमा वी शेख निजाम (मशाल) १३१२, प्रभाग १० (अ) शेख नाजीम शेख करीम (फुगा) १३३७, प्रभाग १० (ब) देशमुख हर्षिता रोहन (हात) १०६६, प्रभाग ११ (अ) शबाना परवीन साजीद अहमद खान (हात) १४६६, प्रभाग ११ (ब) पाटील किसन नारायण (हात) १५७९ मते मिळवून विजयी झाले आहेत. प्रभाग १२ (अ) बोबटकार जयश्री संतोष (कमळ) ११५०, प्रभाग १२ (ब) पाटील राजेश विश्वनाथ (हात) १०९७, प्रभाग १३ (अ) आयेशा मोहम्मद जाकीर (हात) १४६९, प्रभाग १३ (ब) खान शेहजाद सलीम (हात) १०८९, प्रभाग १४ (अ) अशोक दौलतराव वानखेडे, प्रभाग १४ (ब) मधवानी हेमलता ब्रिजलाल (कमळ) ११६७, प्रभाग १५ (अ) खर्च माधुरी सोनाजी (कमळ) १११५ आणि प्रभाग १५ (ब) रावळ हरीश महादेवसिंह (हात) १२१२ मते मिळवून विजयी झाले आहेत.
या निकालानंतर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नव्या नगराध्यक्षांकडून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





