मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुक्ताईनगर, सावदा, बोदवड येथिल पोलिस स्थानकांत कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांच्या पोलीस वसाहतीत असणारे पोलीस निवासस्थाने कालबाह्य झालेले असून त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली
जनतेच्या रक्षणाच्या कार्यात असणाऱ्या पोलिस बांधवांसाठी नवीन निवासस्थाने बांधण्याची आवश्यकता असुन सरकारने लवकरात लवकर नविन निवासस्थानाचे बांधकाम करावे अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी अतारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद सभागृहात केली
तसेच यासंबंधी शासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाही विषयी माहिती देण्याची मागणी केली
सदर प्रश्नाला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुक्ताईनगर, सावदा, बोदवड येथिल पोलिस वसाहतीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची
दुरावस्था झाली असुन
मुक्ताईनगर येथील ४४ निवासस्थाने बांधकाम व सावदा येथे ६९ निवासस्थाने बांधकाम करण्याची कामे शासनाने मंजूर केलेल्या दिनांक ०७/०२/२०२३ च्या आदेशानुसार पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या प्राधान्यक्रम यादीत घेण्यात आली असून निधी उपलब्धतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच बोदवड येथे पोलीस स्टेशन व ४८ निवासस्थाने बांधकाम करण्याची कामे शासनाने मंजूर केलेल्या दिनांक ०८/०१/२०२४ च्या आदेशानुसार पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या प्राधान्यक्रम यादीत घेण्यात आली असून प्रकल्पांस संकल्प नकाशे बनविणेकरीता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचेमार्फत सादर करण्यात आलेले प्रकल्पाचे संकल्प नकाशे, नकाशा मान्यता समितीने मान्य केले असून, निविदा नकाशे, अंदाजपत्रके बनविणेचे काम प्रगतीपथावर असून निधी उपलब्धतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
मुक्ताईनगर, सावदा, बोदवड येथे नविन पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्याची आ.एकनाथराव खडसे यांची मागणी
Advertisement
Subscribe to Viral News Live






