नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज समस्यांविरोधात ठिय्या आंदोलन
नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ तास लाईट व बंद स्थितीत डि.पी तात्काळ बदलविण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उबाठा)चे म.रा.वि.वि कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन
मलकापुर:- नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच तास लाईन देण्यात येत असून अनेक वेळा दुरुस्तीच्या नावाखाली तेही पूर्ण दिल्या जात नसल्याने विहिरीत पाणी असताना विजे अभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे, आज दि.16 नोव्हेंबर 26 रोजी शिवसेना सह संपर्कप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात नांदुरा तालुक्यातील मेंढळी, शेंबा येथील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता आर.जी तायडे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
नांदुरा तालुक्यातील मेंढळी बगाडे डि.पी वर लोड वाढल्याने 100 के.व्हि करण्यात यावी व लोड शिफ्ट करण्यात यावा, बावस्कर डि.पी वरील केबल,फ्युज जळून खाक झाल्याने मेन्टेन्स मधून तात्काळ दुरुस्ती, शेंबा मुंधडा डि.पी वर एकाच बाजूने जास्त कनेक्शन झाल्याने चार – पाच टाकून दुसऱ्या बाजूने विज कनेक्शन जोडणी करावी,शेंबा येथील भोपळे डि.पी वर तिन पोल चे काम, कंडारी येथील उमरा रामा डि.पी,निर्मल डि.पी मेन्टेन्स मधून दुरुस्ती, वडनेर भोलजी येथील पाच पोलवरील चोरी गेलेल्या विद्युत तारा तात्काळ ओढण्याची या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या संदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,मेंढळी शाखा प्रमुख किसना मानकर, गजानन सोनोने शेंबा, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम,प्रशांत खांदे, विनोद बावस्कर, संजय डोफे, राजेंद्र महाकाळे, उज्वल कोल्हे,महेंद्र डोफे, योगेश दांडगे, शरद झांबरे, गणेश गायकवाड, रजनीश बहुरूपे, वसंता गायकवाड, अक्षय कोळस्कार, विनोद बावस्कार, भाऊराव सोयस्कर, ईमामभाई , रफीकभाई पजायेवाले सह असंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.शेतकऱ्यांचे व शिवसेना पदाधिकार्यांचे रौद्र रूप पाहून उपरोक्त कामे तातडीने मार्गी लावण्याचे कार्यकारी अभियंता आर.जी तायडे यांनी कनिष्ठ अभियंता यांना सूचित केले.
