Malkapur News

मलकापुरातील शेतकऱ्यांना ५ दिवसांत पीक विमा द्या; शिवसेना उबाठाचा आमरण उपोषणाचा इशारा

पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पाच दिवसात पीक विमा द्या अन्यथा विमा कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शिवसेना (उबाठा)चा आमरण उपोषणाचा इशारा
मलकापुर :- तालुक्यातील शेतकऱ्यांची यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असून अनेक शेतकऱ्यांनी 25 -26 चा पिक विमा काढलेला आहे. त्यामध्ये सोयाबीन मका, कापूस, तूर इत्यादी कोरडवाहू शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. वरील पिक विमा कंपनीच्या निकषाप्रमाणे कृषी विभागामार्फत प्लॉट टाकलेले होते, त्याची कापणी केल्यानंतर नुकसान ठरवीत असतात परंतु दुष्काळामुळे सर्व पिके नष्ट झाली आहे .पीक नसल्यामुळे कापणी होत नाही तरी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. येत्या पाच दिवसात पिक विमा मिळावा अन्यथा पिक विमा कंपनीच्या कार्याला ताला ठोकून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येईल होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कारल्याची राहील याची नोंद घेण्यात यावी असा इशारा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, किसान सेना तालुका उपप्रमुख विश्वनाथ पुरकर, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम,रफिक भाई पजायवाले, इमाम भाई, सुरेश गोंड, ज्ञानेश्वर बेलोकार, प्रकाश सिंग राजपूत, वासुदेव भोगे, वासुदेव सोनोने, एकनाथ गायकवाड, रशीद खाॅ चाॅद खाॅ, भगवान तायडे, पुंडलिक मालठाणे, नारायण कोकाटे, मोहन हिवरखेडे, गोपाळ दळवी,हसन गौरी,हरी हिवरखेडे, रामराव गायकवाड, श्रीकृष्ण डोबाळे, श्रीकृष्ण क्षीरसागर, संतोष इंगळे, श्रावण दाभाडे, वसंता तारापुरे, नंदकिशोर गवते, परमेश्वर डोबाळे, श्रीकृष्ण सुशीर, परमेश्वर वाघ, परवीन शफी उल्ला खान सह तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply