newsसांगली

१४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा; उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह कारावासाची तरतूद

सांगली : १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा असून, बालकामगार प्रथा रोखण्यासाठी १४ नोव्हेंबरपासून बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार असून, हॉटेल, दुकाने, चहाच्या टपऱ्या, गॅरेज तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांच्या मालकांनी बालकांना कामावर ठेवू नये, असे आवाहन सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी केले आहे.

बालदिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या सप्ताहादरम्यान बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी विविध स्तरांवर जनजागृती केली जाणार आहे. बालपणात शिक्षण घेण्याऐवजी बालकांना कामावर लावल्याने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. त्यामुळे बालकामगार प्रथेला आळा घालण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.

बाल आणि किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ मधील तरतुदीनुसार १४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही कामावर ठेवणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना कायद्याने प्रतिबंधित केलेल्या उद्योगांमध्ये आणि प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास मनाई आहे.

या कायद्याचे उल्लंघन करून १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना प्रतिबंधित कामांमध्ये नियुक्त केल्यास संबंधित मालक अथवा नियोक्त्याला २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड, सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी दिली.

बालकामगार प्रथा रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि बालकांच्या शिक्षण व सुरक्षित भविष्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply