Malkapur

मलकापूरच्या कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; एनसीसी संचलनाने वेधले लक्ष

मलकापूरच्या कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; एनसीसी संचलनाने वेधले लक्ष

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मलकापूर प्रतिनिधी : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. गोपाल भूतडा तसेच मलकापूरच्या वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. जयश्रीताई खर्चे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. गोपाल भूतडा यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

ध्वजारोहणानंतर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने दिमाखदार संचलन सादर करण्यात आले. प्रा. मो. जावेद यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेट्सनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत अचूक पदताल आणि मानवंदना सादर केली. कॅडेट्सच्या या उत्कृष्ट संचलनाने उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गोपाल भूतडा यांनी तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या माध्यमातून आजचा तरुण देशाला आत्मनिर्भर बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असे सांगितले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. जयश्रीताई खर्चे यांनी विद्यार्थ्यांनी सुदृढ आरोग्य, सकारात्मक विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी जपत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावी, असा संदेश दिला. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला आयक्यूएसी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचणे, प्रा. संगीता खर्चे, डॉ. मंजिरी करांडे, प्रा. नितीन खर्चे, प्रा. संतोष शेकोकार, प्रा. योगेश सुशीर, प्रा. सुदेश फरपट, प्रा. साकेत पाटील, प्रा. गजानन सुपे, प्रा. महेश शास्त्री, प्रा. पांडुरंग चोपडे, प्रा. मधुकर टेकाडे, प्रा. मनीष आचेलिया, प्रा. सचिन भोळे, प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. आचल गोळे, प्रा. पुनम पठ्ठे, प्रा. स्नेहल पवार, प्रा. माधुरी राजपूत आणि प्रा. माधुरी चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.

तसेच रमाकांत राणे, अनिता होले, शरद पाटील, ललित कोलते, तेजस हिंगे, ललित तायडे यांच्यासह इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. कैलास कोळी आणि एनएसएस अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साखरे यांनी केले.

भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रभक्तीच्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना मिठाई वाटप करून करण्यात आली.

Tags: मलकापूर, स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एनसीसी, स्वातंत्र्य दिन सोहळा, डॉ. गोपाल भूतडा, डॉ. जयश्रीताई खर्चे, डॉ. अनिल खर्चे

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply