HomeMalkapurपद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयात डिप्लोमा प्रवेश मार्गदर्शन व फॅसिलिटी...

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयात डिप्लोमा प्रवेश मार्गदर्शन व फॅसिलिटी सेंटर सुरू; (विद्यार्थी-पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद)

-

मलकापूर: येथील तंत्रशिक्षण क्षेत्रात अग्रगण्य आणि नामांकित असलेल्या पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रथम वर्ष पोस्ट एसएससी दहावी नंतरचे पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष मार्गदर्शन व मोफत फॅसिलिटी सेंटरची सुरुवात करण्यात आली असून, या अभिनव उपक्रमास पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी दिली आहे. तंत्रशिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे अधिकृत प्रवेश वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून यानुसार महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र पूर्ण क्षमतेने सज्ज झाले आहे.

या अधिकृत वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे आणि अर्ज निश्चितीची प्रक्रिया २० मे २०२६ पासून सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जून २०२६ पर्यंत असणार आहे; तसेच प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी २४ जून २०२६ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, तर या यादीत काही तक्रार किंवा दुरुस्ती असल्यास ती सादर करण्यासाठी २५ जून ते ३० जून २०२६ हा कालावधी देण्यात आला असून सर्व हरकतींचा विचार करून अंतिम गुणवत्ता यादी ०२ जुलै २०२६ रोजी जाहीर केली जाणार आहे. या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची दारे सुलभ व्हावीत म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले जात आहे. पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयातील फॅसिलिटी सेंटरवर मोफत ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आणि अर्ज निश्चितीची संपूर्ण प्रक्रिया विनाशुल्क करून दिली जात आहे. या सेंटरमध्ये येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व गुणवत्तेनुसार योग्य अशा अभियांत्रिकी शाखांची निवड करण्याचे करिअर मार्गदर्शन, प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची अधिकृत पडताळणी, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत मनामध्ये असणाऱ्या विविध शंकांचे निरसन, तसेच भविष्यातील उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधी संदर्भात महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मोफत व सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ऐनवेळी धावपळ न होता योग्य शाखा निवडता यावी, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कोणत्याही त्रुटीशिवाय अत्यंत सुलभ व सोपी व्हावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची सुवर्णसंधी स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, हाच या विशेष उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयात प्रवेशासाठी किमान पात्रता १० वी परीक्षेत किमान ३५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध असलेले नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे चालू वर्षाचे वैध पात्रता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे, जेणेकरून त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येईल. पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, उच्चशिक्षित, अनुभवी व कल्पक प्राध्यापक वर्ग, नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील उत्कृष्ट प्लेसमेंट (नोकरी) सुविधा तसेच काळाची गरज ओळखून राबवली जाणारी उद्योगाभिमुख शिक्षण पद्धती यांमुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास कमालीचा वाढला असून, या महाविद्यालयाकडे संपूर्ण परिसरातील विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयात भेट देऊन या सुविधेचा तात्काळ लाभ घ्यावा, तसेच या प्रवेश प्रक्रिये संदर्भातील अधिक सविस्तर माहिती, पात्रता नियम व प्रवेशासाठी ८९८९२२९८९८ या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts