
आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते झाले उद्घाटन
मुक्ताईनगर प्रतिनिधी…. संत शिरोमणी भीमा भोई यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीतून ५० लाख रुपये खर्चाचे बांधण्यात आलेल्या भोई समाज मंगल कार्यालयाचे उद्घाटन 25 मे रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
संत शिरोमणी भीमा भोई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भोई समाज मंडळाचे अध्यक्ष एस.ए.भोई हे होते. व्यासपीठावर मुक्ताईनगर भोई समाज तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक छोटू भोई, शिवसेना अनुसूचित जाती जमाती सेना तालुकाप्रमुख राजेंद्र वानखेडे,नगरसेवक बबलू कोळी, नगरसेवक गणेश टोंगे, माजी नगरसेवक निलेश शिरसाठ, माजी नगरसेवक मुकेश वानखेडे, पंकज कोळी, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे , अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष अफसर खान, मनसेचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे भोई समाजासाठी मंगल कार्यालय आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार निधीतून बांधून दिले त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व भोई समाज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी असून आपल्या समाजाला भाऊच्या माध्यमातून मला नगरसेवक होण्याची संधी मिळाली असे तालुकाध्यक्ष छोटू भोई यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोलताना समाजाचे सभागृह हे आपले हक्काचे व्यासपीठ असते. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघांमध्ये सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. भोई समाज मंगल कार्यालयच्या सु शोभीकरणासाठी २० लाख रुपये देत असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
मंगल कार्यालय मध्ये ग्रंथांचे वाचनालय, श्री यांच्या लग्नाला वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी व्हावे, लहान मुलांवर संस्कार घडविण्यासाठी संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे अध्यक्षीय भाषणात एस.ए.भोई यांनी सांगितले.
भोई समाज मंडळाचे शहर अध्यक्ष प्रवीण भोई, उपाध्यक्ष मनोज भोई व सहकारी नवतरुण युवकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला.
भोई समाजाच्या मुक्ताईनगर पंचायत समितीच्या पहिल्या पंचायत समिती सदस्य भारती छोटू भोई यांचा सत्कारही वेळी आमदार पाटील यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक वाडेकर यांनी तर आभार शहराध्यक्ष प्रवीण भोई यांनी मानले. कार्यक्रमाला भोई समाज महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
