Homenewsउपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे जिल्ह्यात तीन दिवसीय दुखवटा

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे जिल्ह्यात तीन दिवसीय दुखवटा

-

बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा आशाताई अनंतराव पवार यांचे आज, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दि. २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या तीन दिवसांत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकावण्यात यावे. तसेच दुखवटा कालावधीत कोणत्याही प्रकारचे शासकीय अथवा सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तसेच, शासनाच्या सूचनेनुसार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये व आस्थापना बंद राहतील, असे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी जारी केले आहे.

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts