
मुक्ताईनगर येथील आज दिनांक ३१/१२/२०२५ रोजी जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्र.२,मुक्ताईनगर येथे बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मुक्ताईनगरचे लाडके आमदार मा. आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या मेळाव्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकूण ४० स्टॉल्स उभारले होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ व शैक्षणिक साहित्याचे आकर्षक प्रदर्शन व विक्री केली. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व उत्साहाने आपली कला व कौशल्य सादर केले, ज्याचे उपस्थित पालक व पाहुण्यांनी मनापासून कौतुक केले.
या मेळाव्यातून सर्व ४० स्टॉल्सद्वारे एकूण ₹२०,०००/- (वीस हजार रुपये) इतकी विक्री झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक देवाण-घेवाण, संघभावना तसेच आत्मनिर्भरतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने बाल आनंद मेळावा हा उपक्रम अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.सदर कार्यक्रमात माफद अध्यक्ष श्री विनोद भाऊ तराळ,शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान,मणियार बिरादरी जिल्हाउपाध्यक्ष हकीम चौधरी,डॉ.अजहर अली, हाफिज मोहसीन तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत चे नवर्चित नगरसेवक मुशीर मणियार,मस्तान कुरैशी, लुकमान बेपारी,वसीम खान, हाशम शाह, नईम बागवान,माजी नगरसेवक आसिफ बागवान, जाफर अली,शकील मेम्बर, शरीफ बेपारी,आसिफ पेंटर,शकूर जमादार, सादिक पेंटर, अहमद ठेकेदार, अनिस पटेल,अकिल मुसा, जाकीर जमादार आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमात शाळाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फिरोज शेख,तसलीम शाह ,हकीम मणियार सरफराज मणियार,आझम शेख,अकिल शेख,शाळेचे मुख्याध्यापक रिजवान खान, उपशिक्षक इरफान खान,मेहफुजा खान,शरीफ तडवी व मुसा सर या सर्वांनी खूप सहकार्य केले व कार्यक्रमाला पार पाडले





