मुक्ताईनगर प्रतिनिधी : ..

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुक्ताईनगर शाखेच्या वतीने यावर्षी दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथील ज्ञानेश्वर सभागृह येथे आयोजित करण्यात आला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.आय.डी. पाटील, प्रमुख उपस्थिती अभाविप देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष प्रा.डॉ.गिरीष कुलकर्णी व कार्यक्रम प्रमुख गणेश देशमुख हॆ होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
प्रा.डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची जाणीव जोपासावी, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ.आय.डी. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत सातत्यपूर्ण परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जळगाव विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, दुर्गेश जाधव, प्रवीण राठोड
कार्यक्रमास पालक, शिक्षक व तसेच कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनिता काळे, सानिका सोनार, दिक्षा तेडले, गौरी दैवे, योगेश्वर सिरसे व मानव मिस्त्री, सुमित माळी यां कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
