Homebuldhanaहातभट्टी व अवैध दारूविक्रीविरोधात एलसीबीची धडक मोहीम; 31 हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल...

हातभट्टी व अवैध दारूविक्रीविरोधात एलसीबीची धडक मोहीम; 31 हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

-

बुलढाणा, दि. 2 जून : बुलढाणा जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती, साठवणूक व देशी-विदेशी दारूच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 31 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारूचे अड्डे, विनापरवाना देशी-विदेशी दारूचा साठा, चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी विविध पथके तयार करून विशेष मोहीम राबविली.

या मोहिमेअंतर्गत 1 जून 2026 रोजी मेहकर, अंढेरा, बुलढाणा शहर आणि नांदूरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी कारवाया करण्यात आल्या. मेहकर येथील गवळीपुरा भागात मोहम्मद जुम्मा गवळी (वय 40) व इमाम रेहमू परसुवाले (वय 55) यांच्या ताब्यातून हातभट्टी दारू व मोहसडवा जप्त करण्यात आला.

अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगाव आटोळ येथे करण्यात आलेल्या कारवाईत एका 40 वर्षीय महिलेसह सुभाष रामराव मोरे (वय 55) आणि मदन बाळाजी मोरे (वय 52) यांच्या ताब्यातून हातभट्टी दारू व मोहसडवा जप्त करण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्यही हस्तगत करण्यात आले.

बुलढाणा शहरातील त्रिशरण चौक परिसरात एका 50 वर्षीय महिलेच्या ताब्यातून 25 लिटर हातभट्टी दारू व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. तर नांदूरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे महादेव सखाराम सुशीर (वय 45) याच्या ताब्यातून देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

या सर्व कारवायांमध्ये एकूण सात गुन्हे नोंदविण्यात आले असून हातभट्टी दारू, देशी-विदेशी दारू आणि मोहसडवा असा एकूण 31 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Related articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts