मुक्ताईनगर प्रतिनिधी……
1 जून रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरली व इतर गावासह संपूर्ण परिसरात वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, कापूस, मका, ज्वारी, भाजीपाला व इतर फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पत्रे उडून, जनावरांच्या गोठ्यांची पडझड होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. राहुल पाटील , विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन गोसावी,ॲड. देवेंद्र बोदडे यांनी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना निवेदन दिले.
प्रमुख मागण्या मागण्या:…..
1. तात्काळ महसूल, कृषी यांच्या संयुक्त पथकामार्फत नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत.
2. पंचनामे करताना कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करावी.
3. वरील शासन निर्णयानुसार तात्काळ आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.
4. पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना 72 तासांच्या आत नुकसान कळवून भरपाईची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश द्यावेत.
5. ज्या शेतकऱ्यांची घरे व गोठ्यांची पडझड झाली आहे त्यांना घरकुल व गोठा दुरुस्तीसाठी स्वतंत्र मदत देण्यात यावी.
