मुक्ताईनगर पोलिसांची तत्परता ……
ऑनलाईन फसवणुकीत गेलेली रक्कम ४९,२६०/- रुपये तक्रारदार यास परत
मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
मुक्ताईनगर शहरातील रहिवासी वासुदेव रामभाऊ भंगाळे यांच्या सोबत ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडलेला होता. त्यावरुन त्यांनी सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क करुन तक्रार केली. सदरची तक्रार सायबर विभागाकडून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आली सदर तक्रार प्राप्त होताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.अं. प्रदिप देशमुख यांनी तातडीने ज्या खात्यात सदरचे पैसे वर्ग झाले त्या संबंधित बँकेला पत्रव्यवहार करुन सदरचे खाते गोठवले व त्यानंतर सर्व कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करुन अर्जदार वासुदेव भंगाळे यांची फसवणुक झालेले एकुण ४९,२६०/- रुपये परत मिळवून त्यांच्या अकाऊंटला जमा करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी याव्दारे मुक्ताईनगर शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना कोणत्याही अनोळखी लिंक, OTP, QR code किंवा गुतवणुक व नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये, ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक , पोलीस कर्मचारी यांच्या तत्परतेचे स्वागत होत आहे.