Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग वर ट्रॅव्हल्स चा अपघात… 29 प्रवासी जखमी

मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग वर ट्रॅव्हल्स चा अपघात… 29 प्रवासी जखमी

मुक्ताईनगर प्रतिनिधी: …..

मुक्ताईनगर पासून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर मुक्ताईनगर तालुक्यातील प्रवीण सर्व्हिस सेंटर (पेट्रोलियम) समोर रात्री १.३० वाजेच्या सुमारास एका ट्रकला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या साई दर्शन ट्रव्हलने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ट्रव्हलचे समोरील भाग पूर्णपणे चुराडा झालेला असून, ट्रव्हलमधील चालक व 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादीनुसार, राजेंद्र विनायक सेंदाणे (वय ५६, रा. बोदर्डे ता. पारोळा, ) हे ट्रक क्रमांक MH-18 BZ-7039 उमरेड, नागपूर येथून कोळसा घेऊन नरडाणा ता. शिदखेडा, जि. धुळे येथे जात असताना .२७ रोजी रात्री १.३० वाजता प्रवीण सर्व्हिस सेंटरसमोर त्यांच्या ट्रकला मागून साई दर्शन ट्रव्हल (क्रमांक MP-44 ZB-0777) ने जोरदार धडक दिली. ट्रक चालक राजेंद्र सेंदाणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ट्रव्हल चालक अक्षय संतोष पाटील यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व हयगयाने वाहन चालविले, ज्यामुळे अपघात होऊन ट्रव्हलमधील चालक व 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच, तेथे जमलेल्या लोकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेत टाकले व उपचारासाठी रवाना केले.ट्रक चालक राजेंद्र सेंदाणे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी वरून ट्रव्हल चालक अक्षय पाटील याने हयगयाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर करीत आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles