Homemuktainagarमुक्ताईनगर येथे नाथजोगी समाजातर्फे धर्मनाथ बीज उत्सव साजरा

मुक्ताईनगर येथे नाथजोगी समाजातर्फे धर्मनाथ बीज उत्सव साजरा

-

मुक्ताईनगर। प्रतिनिधी……

शहरातील नारायणनगर मधील आर. टी. जोगी यांच्या घरी २० जानेवारी रोजी धर्मनाथ बीज निमित्त नाथ जोगी समाजाच्या वतीने धर्मनाथ बीज साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता श्री नवनाथ महाराज यांची आरती मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा देवयानी निलेश शिरसाट यांचे हस्ते करण्यात आली. प्रसंगी नगरसेविका माधुरी सचिन पाटील, नगरसेवक गणेश टोंगे, स्वीकृत नगरसेवक बंटी जैन , बाळा चिंचोले त्यांचेसह जोगी समाजाचे महिला पुरुष मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंतर शहरात भव्य शोभायात्रा काढत श्री नवनाथ महाराज पालखी सोहळा साजरा करण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील , नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा संजना पाटील यांनी धर्मनाथ बीज निमित्त समाज बांधवांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी पालखीचे पूजन केले.

संत मुक्ताईनगरीत जोगी समाज बांधवांच्या वतीने “धर्मनाथ बीज” निमित्ताने गेल्या सात दिवसांपासून कीर्तनकार ह. भ. प. राजकन्या जोगी यांच्या सुश्राव्य वाणीतून नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा रमेश जोगी यांच्या घरी सुरू होता. धर्मनाथ बीज च्या दिवशी पुरोहित म्हणून भगवान मोरे (वाडा, पालघर) यांनी केले.

सोहळ्याची सांगता २० जानेवारी धर्मनाथ बीज दिनी श्री नवनाथ महाराज पालखी सोहळा नारायण नगर पासून मुख्य रस्त्याने पुढे नगरपंचायत, भन्साली ट्रेडर्स, प्रवर्तन चौक ते नारायणनगर पर्यंत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. जोगी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या या “धर्मनाथ बीज” दिंडी सोहळ्यात अलख निरंजन, आदेश, नवनाथ महाराज की जय तसेच आदिशक्ती मुक्ताबाई की जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

रुद्र भावेश जोगी , ओम राजु जोगी , श्रीराज राजमेश जोगी , लक्षित संजोग जोगी या मुलांनी नाथांची तर गुंजन गणेश जोगी हिने संत मुक्ताई ची वेशभूषा परिधान केली होती. यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.शोभा यात्रे नंतर रमेश जोगी यांच्या घरी महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली
नगरसेवक संतोष (बबलू) कोळी , राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, ह. भ. प. दुर्गाताई मराठे, माजी नगरसेवक तथा पत्रकार संतोष मराठे, माजी नगरसेवक निलेश शिरसाट, माजी नगरसेवक ललित महाजन, माळी समाजाचे सचिव संजय माळी, वंजारी समाजाचे जिल्हा अध्यक्ष कैलास वंजारी, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार मोहन मेढे, पत्रकार संदीप जोगी, मोतीलाल जोगी, मुकेश महल्ले, राजेश चौधरी, दीपक चौधरी, निलेश मेढे, पंकज कपले यांचे सह ज्येष्ठ नागरिक संघाचे नागरिक , शहरातील समाजातील महिला पुरुषांनी पालखीचे स्वागत करून पूजन केले

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts