इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध समितींची संयुक्त बैठक संपन्न

Advertisement

*इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध समितींची संयुक्त बैठक संपन्न*

 

Advertisement

जळगाव: दिनांक 16.12. 2025 इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सखी सावित्री समिती, महिला सुरक्षा समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती तसेच परिवहन समिती यांची एकत्रित व महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण कल्याण, सुरक्षितता, आरोग्यविषयक जाणीव तसेच शाळा-परिसरातील सुरक्षित वातावरण निर्माण करणे या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुबशशीरा मुबीन शेख यांच्या कुराण पाठाने झाली.या संयुक्त बैठकीला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. मिदहत फातेमा शेख हारून, नामांकित फिटनेस एक्सपर्ट निगार शाह तसेच पोलीस दलाच्या वतीने सय्यद निलोफर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. डॉ. मिदहत फातिमा यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्यविषयक समस्या, किशोरवयीन मुलींची विशेष काळजी, स्वच्छता, पोषण आहार, मानसिक आरोग्य व वैद्यकीय तपासणीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी वेळेवर उपचार, आरोग्याबाबत लाज किंवा भीती न बाळगता योग्य व्यक्तींशी संवाद साधण्याचा सल्ला दिला.IMG 20251216 WA0020

फिटनेस एक्सपर्ट निगार शाह यांनी दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व, संतुलित आहार, योग-प्राणायाम, शारीरिक तंदुरुस्ती तसेच मोबाईल व स्क्रीन टाइमचे दुष्परिणाम यावर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस दलाच्या प्रतिनिधी सय्यद निलोफर यांनी महिला व विद्यार्थी सुरक्षेसंबंधी कायदे, सायबर गुन्हे, छेडछाड, वाहतूक नियम, शाळेच्या आवारात व प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. कोणतीही अडचण आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक काझी जमीर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांची सुरक्षितता, महिलांचा सन्मान व शाळेतील शिस्त याबाबत समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची रूपरेषा शेख जाकीर बशीर यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांनी विद्यार्थिनी साठी शाळेत असलेले विविध सुख सुविधांचे वर्णन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेख गजाला कासिम यांनी केले. पालक वर्गा तर्फे शेख हिना कौसर जमील व मिर्झा अंजुम यांनी आपले विचार मांडले .त्यांनी आपल्या विचारात आईने मुलीं ची कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे स्वागत खान शगुफ्ता यांनी केले. आभार खान तांझिम आरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी खान यास्मिन आरा, शेख सुमाय्या , खान सादिया ,खान नाझमीन, काझी झीनत , शेख अनिसा, खान मेहरूनिसा ,खान मुमताज , शेख रीफत यांनी सहकार्य केले.

ही संयुक्त बैठक शाळेतील विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितता, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरली असून अशा उपक्रमांमुळे शाळा-परिसरात सकारात्मक व सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. फक्त मुलींसाठी घेतलेला या कार्यक्रमाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अब्दुल करीम सालार साहेब, चेअरमन डॉक्टर ताहेर शेख साहेब , सचिव एजाज मलिक यांनी व सोसायटीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

Subscribe to Viral News Live