सकाळच्या बससाठी दोन कि.मी पायी ये-जा व दुपारच्या गाडीवर शाळेच्या दोन तासिका सोडून यावे लागत असल्याने शिवसेना (उबाठा)ने आगार व्यवस्थापकांना महिना भरापुर्वी दिले होते निवेदन
बस टाकळी घडेकर गावापर्यंत व सकाळ- सायंकाळचे टाईम बदलविण्याची मागणी
मलकापुर:- मलकापूर ते पोफळी ही बस टाकळी फाट्यावरून जात असून टाकळी घडेकर येथील विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर टाकळी फाट्यावर पायी ये-जा करावी लागते तसेच दुपारी 3 वाजताच परतीची बस असल्याने शाळेच्या दोन तासिका सोडून यावे लागत असल्याने विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी दि.1 जुलै 26 रोजी महिना भरापुर्वी आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले महिना उलटूनही बस टाकळी गावात न आल्याने व दुपारच्या बस ची अद्यापही वेळ न बदलविल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या दोन तासिका सोडून यावे लागत असल्याने आज दि.24 जुलै 26 रोजी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात विद्यार्थी, पालक व शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी शाळा भरविल्याने एकच खळबळ उडाली.
बस टाकळी घडेकर गावाचा गावात येत नसल्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर पायी टाकळी फाट्यावर यावे लागते व मलकापूर येथून दुपारी साडेतीन वाजताच परत येण्यासाठी बस असल्यामुळे शाळेच्या दोन तासिका सोडून त्यांना तीन वाजताच बसस्थानकावर यावे लागत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी सकाळी मलकापुर बस ची वेळ 8;30 ते 8;45 व सायंकाळी 5;15 वाजता करून बस टाकळी घडेकर गावापर्यंत करण्याची मागणी महिना भरापूर्वी निवेदनाद्वारे केली होती या वेळेत बदल न केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल पर्यायाने शिवसेनेला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात होता.पावसाळ्यात बस गावातून पलटत नसल्याचे कारण बस चालकाने सांगितले असता दहा – पंधरा दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी स्वखर्चाने मुरुम टाकून जे.सि.बी द्वारे फैलावून दबाई केली मात्र बस टाकळी घडेकर गावात आली नाही व बसची सायंकाळची वेळ ही बदलविण्यात आली नसल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी, ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक यांचे कार्यालयात शाळा भरविली शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी केलेल्या या आंदोलनाच्या धास्तीने आज दुपारच्या बस ची वेळ बदलवून बस टाकळी घडेकर गावात जाणार असल्याचे आश्वासन प्रभारी आगार व्यवस्थापक देशमाने यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी, ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.यावेळी शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत,शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम,युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी,किसान सेना उपतालुकाप्रमुख विश्वनाथ पुरकर, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम, विभागप्रमुख चाॅद चव्हाण, विभागप्रमुख सत्तार शाह, शाखाप्रमुख रफीकभाई पजायेवाले, गजानन उंबरकर, गजानन बाम्हंदे,ज्ञानेश्वर इंगोले, विजय मुसळे,अमोल मुसळे, गजानन बाम्हंदे, गणेश बाम्हंदे, महादेव बाम्हंदे, राजेश घडेकर, प्रदीप बाम्हंदे विनोद बाम्हंदे, दिनकर गोडळेकर, संदीप बाम्हंदे, विक्रम बाम्हंदे,आनंद बाम्हंदे, ईश्वरी मुसळे, अंजली बाम्हंदे, गायत्री बाम्हंदे, आराध्या मुसळे,वैष्णवी बाम्हंदे, उपासना इंगोले, लावण्या बाम्हंदे,प्रेम बाम्हंदे, शुभम बाम्हंदे, समर्थ इंगळे, ओम बाम्हंदे,अर्णव बाम्हंदे,समर्थ घडेकर,चंचल मख ,निखिल जंगले, नंदिनी बाम्हंदे, आयर्न पाटील, दिनेश बाम्हंदे सह आदिंची उपस्थिती होती.
