Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केली कुटुंबाची स्वतः स्व – गणना

मुक्ताईनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केली कुटुंबाची स्वतः स्व गणना

मुक्ताईनगर प्रतिनिधी….
भारताच्या जनगणना 2027 या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर येथे १ मे कामगार दिनी केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी पोर्टलच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने (स्व- गणना) नोंदवून घेतलेली आहे. प्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे , निवडणूक नायब तहसीलदार झांबरे , जनगणना ऑपरेटर सिद्धांत बोदडे उपस्थित होते.
देशाच्या उज्वल भविष्यासाठी आणि योग्य नियोजनासाठी जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आपण स्वतः आपल्या कुटुंबाची माहिती स्व गणना पद्धतीने स्वतः ऑनलाईन नोंदवून घेण्याचे आवाहन जनतेला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केलेले आहे.

नागरिकांनी आपली जबाबदारी समजून १ मे ते 15 मे दरम्यान स्व गणना मध्ये 33 प्रश्नांची अचूक उत्तरे भरायची आहेत. नंतर एस सी आय डी जनरेट होईल तो नागरिकांनी जपून ठेवावा . 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना एस सी आय डी नंबर द्यावयाचा आहे एस सी आय डी नंबर द्यावयाचा आहे. मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार गिरीश वखारे व निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी केलेले आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles