Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू , कर्मचाऱ्यांची विमा संरक्षण व मोबाईलची मागणी

मुक्ताईनगर येथे जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू कर्मचाऱ्यांची विमा संरक्षण व मोबाईलची मागणी
मुक्ताईनगर येथे जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू कर्मचाऱ्यांची विमा संरक्षण व मोबाईलची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी….भारताच्या जनगणना 2027 या कार्यक्रमानुसार मुक्ताईनगर येथे दोन टप्प्यात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेले असून कर्मचाऱ्यांनी जनगणना कामी भ्रमणध्वनी आणि विमा संरक्षण कवच कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी केली आहे. जनगणनेच्या प्रशिक्षण वर्गाची उद्घाटन तहसीलदार गिरीश वखारे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे हे प्रमुख तर अतुल लोंढे , विजय चौधरी,सुधाकर सावळे,गणेश कोळी,हेमंत बोरकर हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.

दोन टप्प्यात होणारे या प्रशिक्षण वर्गासाठी एकूण 270 प्रगनक गट असून 270 प्रगणक हे नोंदणी करणार आहे 270 प्रगणकांवर 50 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली असून घरोघरी जाऊन ही जनगणना करण्यात येणार आहे

जनगणनेचा कार्यक्रम मार्च 2027 पर्यंत सुरूच राहणार आहे. जनगणनेमध्ये एकूण पहिल्या टप्प्यात 34 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये जमिनीसाठी वापरलेले साहित्य, भिंतीसाठी चे साहित्य,शेतकऱ्यांसाठी चे साहित्य,गणनाघराच्या वापरा संबंधित खात्री,कुटुंब प्रमुखांशी संबंधित माहिती घराच्या मालकी हक्काची स्थिती, निवास योग्य खोल्या, कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या, पिण्याचे पाणी व त्याचे स्त्रोत प्रकाशाचा मुख्य स्त्रोत शौचालयाची उपलब्धता सांडपाणी साठी केलेली व्यवस्था, टीव्ही, संगणक, इंटरनेट ,दुचाकी, चार चाकी कुटुंबात सेवन न केले जाणारे धान्य यासह विविध माहिती विचारण्यात आलेली आहे.

## विमा संरक्षण कवच तसेच मोबाईल देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी….. जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांना घरोघरी फिरावे लागणार आहे 15 जून पासून या जनगणनेला प्रत्यक्ष पहिल्या टप्प्यात सुरुवात होणार असून उन्हाळ्याचा काळ असल्याने शिक्षकांना व नेमणूक दिलेल्या कर्मचाऱ्यांना उन्हामध्ये हे काम करावे लागणार आहे त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यांना विमा संरक्षण असावे व कुटुंबांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने विमा काढून द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यासोबतच नियुक्त फिल्ड ट्रेनर प्रगनक पर्यवेक्षक यांच्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल हे उपलब्ध नाहीत त्यामुळे कोणतीही मानधनातील व वेतनातील कपात न करता कर्मचाऱ्यांन मोबाईल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles