मुक्ताईनगर प्रतिनिधी….. मुक्ताईनगर शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शहरातील प्रवर्तन चौक ते मुक्ताई चौक (बोदवड चौफुली) पर्यंत असलेल्या रस्ता दुभाजकाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार असून 27 एप्रिल सोमवारी सायंकाळी बोदवड चौफुली येथे कामाच्या फलकाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक छोटू भोई , नगरसेवक बबलू कोळी, नगरसेवक बंटी जैन, गणेश टोंगे, प्रमोद भारंबे , मस्तान कुरेशी , आरिफ आझाद, निलेश शिरसाठ, पंकज राणे, अफसर खान ,नूर मोहम्मद खान, आसाम शहा ,गोपाळ सोनवणे ,युनूस खान, वसीम पेंटर , मुशीर मण्यार, संतोष माळी, गौरव दुट्टे , आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौक ते मुक्ताई चौक पर्यंत असलेल्या रस्ता दुभाजकाचे विस्तारीकरण. …. दीड कोटीच्या कामाचे केले आमदार चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन.





