मुक्ताईनगर पोलिसांनी पकडला 2 लाख 43 हजाराचा अवैध वाहतूक होत असलेला गुटखा.
मुक्ताईनगर प्रतिनिधी…… मध्यप्रदेशातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक होत असते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैधरित्या गुटख्याचा साठा व अवैधरित्या होणारी वाहतूक पुर्णतः थांबविण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने २६ मार्च २०२६ रात्री 9 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटा ते सुकळी गावाचे दरम्यान राशा बर्डाजवळ सार्व. रोडवर अनिकेत शिवाजी सुरवसे वय ३५ वर्षे रा. सावरगांव पोस्ट नारी, ता. बार्शी, जि. सोलापुर याच्या ताब्यातील वाहनात २,४३,३६०/- रुपये किंमतीच्या केसरयुक्त विमल पानमसाला व V-१ तंबाखूचा
गुटख्याचा साठा मिळून आला.
तसेच MH-१४/ DX- १४६३ हे 4 लाखाचे चारचाकी वाहन व 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ४८ हजार ३६० मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, डी वाय एसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, उपनिरीक्षक निलेश गोसावी , पोहेकॉ भाऊराव घेटे, पोना असिम तडवी, पोकॉ प्रशांत चौधरी व जवाहर पवार यांच्या पथकाने केली आहे. सदर प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रसंगी महसूल विभागाचे कर्मचारी किरण बावस्कर, कृष्णा माळी उपस्थित होते.




