Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे भाजपा मार्फत आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रमास; केंद्रीय राज्यमंत्री खडसे उपस्थित.

मुक्ताईनगर येथे भाजपा मार्फत आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रमास; केंद्रीय राज्यमंत्री खडसे उपस्थित.मुक्ताईनगर येथे भाजपा मार्फत आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यक्रमास; केंद्रीय राज्यमंत्री खडसे उपस्थित.

मुक्ताईनगर प्रतिनिधी….
भारतीय जनता पक्षा च्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत मुक्ताईनगर येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. या प्रशिक्षण उपक्रमामध्ये कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी, तसेच समाजाभिमुख कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित होत्या.

या प्रशिक्षण महाअभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यासाठी, लोकांशी संवाद अधिक प्रभावीपणे साधण्यासाठी आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या जनकल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरणा देण्यात आली.

मुक्ताईनगर येथे झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा व उत्साह निर्माण होऊन पक्षाच्या विचारांना अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, मंडळ अध्यक्ष (मुक्ताईनगर उत्तर) मोहन महाजन व मंडळ अध्यक्ष (मुक्ताईनगर उत्तर) जयपाल बोदडे , उद्योजक विनोद सोनवणे, ललित महाजन, चंद्रकांत भोलाणे, राजेंद्र सवळे, सचिन पाटील ,कैलास वंजारी, दत्ता जोगी, विजय काठोके , बाळा चिंचोले यांच्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles