Top 5 This Week

Related Posts

रोजा इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकता जोपासणे … सामाजिक कार्यकर्ते एन.जी. शेजोळे.

रोजा इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकता जोपासणे … सामाजिक कार्यकर्ते एन.जी. शेजोळे.

मुक्ताईनगर प्रतिनिधी……
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पवित्र रमजान महिन्या निमित्त भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बंधुता शांतता आणि सामाजिक एक्याचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवून एकात्मतेचा संदेश दिला .
प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक आशिष कुमार आडसुळ , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एन जी शेजोळे पोलीस पाटील जितेंद्र पाटील, माजी सरपंच रामभाऊ पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, संत तुकाराम महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील, अकबर शेठ मोहम्मद शेठ, जहांगीर शहा, शेख रफिक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक आडसुळ यांनी हिंदू मुस्लिम एकात्मता जोपासताना सर्वांना सोबत घेऊन चालणे हीच गावाच्या विकासाची खरी गुरुकिल्ली आहे असे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.जी. शेजोळे यांनी रोजा इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकता जोपासणारी सामाजिक संघटना होय असे आपले मनोगतात व्यक्त केले
गावाच्या विकासासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन पोलीस पाटील यांनी केले ,माजी सरपंच रामभाऊ पाटील यांनी गावात कायम एकोपा जोपासण्याचे काम ज्येष्ठ आणि युवक देखील करतात असे सांगितले इफ्तार च्या माध्यमातून उचंदे गावाने परस्परांमधील प्रेम बंधुता आणि शांततेचा अनोखा संदेश दिला धार्मिक सलोख्याचे हे संपूर्ण चित्र तालुक्यासाठी आदर्श ठरले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छबिलदास पाटील यांनी केले तर आभार पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांनी मानले

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles