मलकापुर:- मराठी नववर्षाच्या शुभपर्वावर गुढीपाडव्याच्या दिवशी मलकापुर येथील बसस्थानकात धुपेश्वर येथील विठ्ठल लहरी बाबांचे कृपेने आर.ओ च्या थंडगार पाणपोई चे उद्घाटन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या हस्ते नारळ फोडून तर आगार व्यवस्थापक मुकूंद न्हावकर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक साहेबराव खांडेकर यांच्या उपस्थितीत योगेश उर्फ टिनू पटेल (गुलाब जर्दा यांच्या सहकार्याने)आज दि.19 मार्च 26 रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान करण्यात आले.
मलकापुर बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाश्यांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन योगेश उर्फ टिनू पटेल यांनी बसस्थानकावर उदात्त हेतूने पाणपोई साठी आर.ओ कॅन उपलब्ध करून देण्याचे सांगितल्याने आज (गुढीपाडवा) मराठी नववर्षाच्या शुभपर्वावर पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अशोक शर्मा,अमर मेहरा, मनोज पाटील,विनोद रवणकार, समाधान राठोड,सत्यजीत सावकाश, शेख अनिस, महेश गावंडे, सुनील इ़गळे, निलेश करांगळे, उल्हास धोरण, हर्षल किरडे, निलेश धनोकार,सह आदिंची उपस्थिती होती.
धुपेश्वर विठ्ठल लहरी बाबांचे कृपेने मलकापुर बसस्थानकावर आर.ओ वाॅटर ची पाणपोई सुरू




