जळगाव : इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शाहीन उर्दू हायस्कूल येथे मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या गौरवगीताने करण्यात आली, ज्यामुळे वातावरणात भाषाभिमानाची भावना निर्माण झाली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी प्रभावी भाषणे तसेच आशयपूर्ण कविता सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणातून मराठी भाषेबद्दलचा आदर, अभिमान आणि जिव्हाळा प्रकर्षाने जाणवला. भाषण व कविता स्पर्धेसाठी जावेद सर आणि अतीक सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे सूक्ष्म मूल्यमापन केले व निकाल जाहीर केला. स्पर्धेत शिजा शफीउल्लाह शाह हिने प्रथम क्रमांक, इरम शेख सलीम हिने द्वितीय क्रमांक तर नमीरा इलियास शाह हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थिनींसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
मराठी विभागाच्या वतीने अनिसा शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाला शेख बरकत सर, मेहरुन्निसा खान मॅडम, रिफत शेख मॅडम, नूरजहां मॅडम तसेच इतर शिक्षकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन मराठी फाउंडेशनच्या उपशिक्षिका तरन्नूम शेख यांनी समर्थपणे पार पाडले. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला असून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अधिक जागरूकता व अभिमानाची भावना निर्माण झाली.
इकरा शाहीन उर्दू हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
Advertisement
Subscribe to Viral News Live





