मुक्ताईनगर प्रतिनिधी….
येथील खडसे महाविद्यालयात “National Conference on Modern Trends in Emerging Sciences – MTES 2026” या राष्ट्रीय परिषदेचे अत्यंत उत्साहपूर्ण व ज्ञानसमृद्ध वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक अशा सुमारे २०० प्रतिनिधींच्या उपस्थितीने महाविद्यालय परिसर संशोधनाच्या नवचैतन्याने भारावून गेला.
परिषदेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी होते. बीजभाषणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा येथील ख्यातनाम अभ्यासक प्रा. डॉ.आशुतोष बेडेकर उपस्थित होते. त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाह, आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज व जागतिक संधी यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. परिषदेचा सविस्तर परिचय डॉ. बालाजी तोटावार (राष्ट्रीय परिषदेचे कन्व्हेनर) यांनी करून दिला, तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी मांडले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य प्रा.डॉ. संजीव साळवे व प्रा. डॉ. वंदना चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले . कॉन्फरन्स चेअरमन प्रा. डॉ. आर. आर. किनगे यांच्या नेतृत्वात संपूर्ण आयोजन पार पडले. डॉ. ए.पी. पाटील समन्वयक, पी.एम.-उषा व डॉ. ए. व्ही. वाकोडे, सह समन्वयक यांचे सहकार्य लाभले.






