मुक्ताईनगर प्रतिनिधी…. बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे बारामती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी बारा वाजता मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या फोटोस पुष्पहार घालून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रसंगी उपस्थित नेत्यांनी अजितदादा पवार यांचे अनुभव सांगत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकप्रतिनिधी, नगरपंचायत, व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्षांचे नेते , पदाधिकारी ,कार्यकर्ते , पत्रकार यांनी उपस्थित राहत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली दिली. गुरुवारी सकाळपासूनच मुक्ताईनगर शहरातील दुकाने बंद असल्याने कडकडीत बंद पाडण्यात आला
मुक्ताईनगर येथे प्रवर्तन चौकामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली.
Advertisement
Subscribe to Viral News Live






