



मलकापुर:- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी नगरातील आई तुळजाभवानी मंदिरात मातेची विधिवत पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज,नेताजी सुभाषचंद्र बोस,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून माल्यार्पण करण्यात आले.आत्मानंद जैन मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्ठान्नदान , उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि बिस्कीट वाटप तसेच दाताळा येथील सेवातिर्थधाम वृद्धाश्रमातील वृद्धांना फळे वाटप करण्यात आले.मलकापुर आगारातील आगार व्यवस्थापक यांचे कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरीदास गणबास, शिवसेना नगरसेवक रफीकभाई बर्तनवाले,सहाय्यक वाहतूक निरीक्षक बि.डी.चव्हाण, प्रमोद आहेर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, युवा सेना शहर प्रमुख मंगेश सातव, उपशहर प्रमुख सागर पाटील,अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै.रहीम,माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, किसान सेना किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेहंगे, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किशोर राऊत,उखर्डा तांदुळकर,विभाग प्रमुख सत्तार शाह, शाखाप्रमुख ईमामभाई, मोहसीनभाई, एजाज भाई,समीरखान युसुफ खान, इक्बालभाई, शाखाप्रमुख शेख नासीर भाई सह आदिंची उपस्थिती होती.






