HomeNanduraनांदुरा खुर्द पंचवटी येथील शिवमहापुराण कथेची ह.भ.प शुभम महाराज देशमुख यांच्या काल्याच्या...

नांदुरा खुर्द पंचवटी येथील शिवमहापुराण कथेची ह.भ.प शुभम महाराज देशमुख यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

-

नांदुरा – प्रतिनिधि
नांदुरा खुर्द पंचवटी येथे दि. १४ ते २१ जानेवारीपर्यंत संगीतमय श्री शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कथावाचक हभप शुभम महाराज देशमुख (जळका तेली) हे होते.
यामध्ये सकाळी ५ ते ६ काकडा, १२ ते ५ संगीत शिव महापुराण कथा, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, दररोज रात्री ८ ते १० हभप पंढरीनाथ महाराज दिघोळे जवळा पळसखेड, अश्विन महाराज कवरे आसलगाव, दत्ता महाराज अहिर आसलगाव, राम महाराज गवारे सांगलुद अंबादेवी, बाल कीर्तनकार प्रज्वली दीदी देशमुख कवठळ गोविंद, मंदार महाराज मेहुणकर, दादा महाराज कोळस्कार वडगाव, तसेच २० जानेवारी रोजी हभप शुभम महाराज देशमुख यांचे काल्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
२१ जानेवारी रोजी भव्य महाप्रसाद व गायनाचार्य हभप राम भाऊ वकटे, अरुण वक्ते, परसराम वक्ते, व धानोरा येथील टाळकरी, गणेश महाराज भानुसे जालना यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिंडी सोहळ्याने सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी नांदुरा खुर्द शहरातील सर्व प्रमुख मार्गावर दिंडी सोहळ्याचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधे कृष्ण दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व समस्त नांदुरा खुर्द येथील सर्व सेवा देत होते.

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts