HomeAkolaअकोल्यात IYF चा दोन दिवसीय तज़किया शिबिर

अकोल्यात IYF चा दोन दिवसीय तज़किया शिबिर

-

अकोला: Shaikh Zaid
इस्लामिक यूथ फेडरेशन (IYF) ही मुस्लिम विद्यार्थी व युवकांची संघटना असून, कुरआन व सुन्नत यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांचे प्रशिक्षण व आत्मिक शुद्धीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. *याच अनुषंगाने IYF महाराष्ट्रचा राज्यस्तरीय दोन दिवसीय तज़किया शिबिर 17 व 18 जानेवारी रोजी अकोला येथील स्टार फंक्शन हॉल, गंगानगर येथे आयोजित करण्यात आला.* या शिबिरात राज्यातील विविध भागांतून IYF शी संलग्न सदस्य सहभागी झाले होते.

शिबिरादरम्यान व्यक्तिमत्त्व विकास व यशस्वी जीवन, कुरआन व सुन्नतशी नाते दृढ करणे, अध्ययनाचे महत्त्व, इस्लामी इतिहास व महान व्यक्तींच्या जीवनकार्यावर आधारित मार्गदर्शक व्याख्याने झाली. सहभागींच्या मानसिक व स्पर्धात्मक क्षमतेच्या विकासासाठी विविध ठिकाणांचे प्रतिनिधित्व करणारे बॅनर व माहितीपर व्हिडीओ तयार करून सादर करण्याचे उपक्रम राबवण्यात आले. तसेच विविध मंचीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ज्ञान व साहित्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने साहित्यिक मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले. या मुशायऱ्यात IYF च्या सदस्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रसिद्ध कवी मोमिन हिंदी (मुंबई) यांनी भूषवले.

शिबिरात ब्रादर आलमगीर हुसैन (ऑल इंडिया अध्यक्ष, IYF), मौलाना जमील सिद्दीकी (लखनौ), माज़ अहमद (उत्तर प्रदेश) यांच्यासह इतर मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी IYF महाराष्ट्रचे अध्यक्ष ब्रादर सैयद रेहान यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप प्रार्थनेने करण्यात आला.

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts