स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी; दीड वर्षांपासून फरार आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद
खामगाव : पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील अपहरण करून खून करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आरोपी अमोल जयसिंग राजपूत (वय 38, रा. इंदिरानगर, वार्ड क्र. 4, जानेफळ) याला स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. या संदर्भात अपराध क्रमांक 204/2024 अन्वये भादंवि कलम 302, 120(ब), 364, 365 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी सौ. ज्योती दिलीप इंगळे (वय 35, रा. इंदिरा नगर, जानेफळ) यांच्या तक्रारीनुसार, दिनांक 22 जून 2024 रोजी रात्री दरम्यान त्यांच्या पती दिलीप इंगळे (वय 45) यांचे अपहरण करून आरोपी अमोल राजपूत व त्याच्या साथिदारांनी अहमदनगर येथे नेले. पुढील तपासात आरोपींनी आपसात संगनमत करून दिलीप इंगळे यांचा खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणात आजवर सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुख्य आरोपी अमोल राजपूत हा गुन्ह्यानंतर दीड वर्षांपासून फरार असून छत्तीसगड, चंदीगड, कर्नाटक, दिल्ली अशा विविध राज्यांमध्ये वेशांतर करून वास्तव्यास होता.
तांत्रिक माहिती आणि सततच्या पाठलागाच्या आधारे तो चंदीगड येथून छत्रपती संभाजीनगर येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर 6 जानेवारी 2026 रोजी हॉटेल राधिका इन, पॅराडाईज चौक येथे त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री. श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, आशा मोरे, निवृत्ती पूड तसेच टेक्निकल ऍनालिसिस विंगचे राजु आडवे, ऋषीकेश खंडेराव, कैलास ठोंबरे व पवन मखमले यांनी सहभाग घेतला.






Great job zafar bhai