Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगरला राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न .जागो ग्राहक जागो …… मोहन मेढे.

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन मुक्ताईनगर तहसील कार्यालया मार्फत तालुकास्तरीय निवडणूक आयोगाच्या अटी व शर्ती नुसार अधीन राहून सदरचा ग्राहक दिन कार्यक्रम जनजागृतीसाठी संत ज्ञानेश्वर सभागृहात मुक्ताबाई महाविद्यालयात घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी धनंजय सापधरे तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत मुक्ताईनगर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक साहित्यिक अ.फ.भालेराव व प्रमुख पाहुणे मोहन मेढे माजी तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत, तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे व्यासपीठावर उपस्थित होते.
मोहन मेढे यांनी आपले मनोगतात सांगितले की 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो सन 1974 ला पुण्यात कैलासवासी बिंदू माधव जोशी व त्यांचे सहकाऱ्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना केली सन 1986 ला 24 डिसेंबरला लोकसभेत ग्राहक संरक्षण कायदा हा पारित केला व 26 डिसेंबरला तत्कालीन महामहीम राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी होऊन एक ग्राहक हितकारी अद्वितीय कायदा अस्तित्वात आला साहित्यिक अ.फ . भालेराव यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकार भारतीय संविधानात सुद्धा नमूद आहे परंतु बदलत्या काळात आता ग्राहक हिताचे कायद्यात काही बदलही करण्यात आले आहे ग्राहकांचे फसवणूक होऊ नये फसव्या टी व्ही चॅनलवरील जाहिरातीवर विश्वास न ठेवता ग्राहकाने जागृत राहावे जेणेकरून आपली फसगत होणार नाही असे उदाहरणाचे दाखले दिले .तहसीलदार गिरीश वखारे म्हणाले की मनुष्य हा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ग्राहकच आहे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात बऱ्याच वस्तू खरेदी करतो ग्राहकाने दुकानदाराला पक्के बिल हे मागितलेच पाहिजे फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक मंचामध्ये अथवा राज्य आयोगाकडे तक्रार करण्याची मुभा आहे अध्यक्षीय भाषणात धनंजय सापधरे यांनी सर्व ग्राहकांना ग्राहक दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाला नायब तहसीलदार प्रदीप झांबरे , मनोज निकम ,तोताराम वंजारी, लक्ष्मण चौके ,श्रीकांत दहिभाते ,स्वप्नील खोले, विक्रम वानखेडे ,विलास महिरे ,रवी नाईक ,स्वप्नील पाटील आदी ग्राहक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पुरवठा निरीक्षक गावडे यांनी केले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles