Top 5 This Week

Related Posts

दोन नंबरचे धंदे चालू असतील तर उरावर बसणार मुक्ताईनगर येथे आ. खडसे यांची पत्रकार परिषद मध्ये माहिती.

मुक्ताईनगर प्रतिनिधी — आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसे हे गुंड प्रवृत्तीचे असून ते गुन्हेगार आहेत असा आरोप केला होता त्यांच्या आरोपाला उत्तर देण्यासंदर्भात आज मुक्ताईनगर येथील संवेदना फाउंडेशन येथे आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळेस ते म्हणाले की, दोन नंबरचे धंदे चालू असतील तर उरावर बसणार आमदार पाटील यांचे संतुलन बिघडलेले असून माहिती न घेता ते बोलतात असा घणाघातीआरोप आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर करीत जवळ जवळ 45 वर्षांपासून राजकारणात असून त्यापैकी 30 ते 35 वर्ष विरोधी पक्षात काम केलेले आहे.मी खरोखरच गुंड किंवा गुन्हेगार असतो.तर आजपर्यंत माझ्यावर शेकडो गुन्हे दाखल असते., मी माझ्या स्वतःसाठी भांडलेलो नाही तर आजपर्यंत जनतेच्या व शेतकऱ्यांच्या समस्यां व हितासाठीच भांडलेलो आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी अथवा पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात काम चुकारपणा अथवा कर्तव्यात कसूर केली आहे अशांना मात्र मी जेलमध्ये पाठवलेले आहे. त्या दिवशी सुद्धा जनतेच्या समस्यांसाठीच सावदा येथे एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझा संविधानिक अधिकार म्हणून माहिती घेण्यासाठी गेलो होतो.परंतु अडीच महिन्यातही मुरुमाची चोरी केलेली असताना गुन्हा दाखल झालेला नाही. उलट लोकप्रतिनिधींचा मान सन्मान न करता उलट उद्धटपणे व अपमानास्पद वागणूक एका अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधीला दिले त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याची तक्रार वरिष्ठांकडे करणार असून त्या संदर्भात विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
सावद्यातील ए.पी.आय. विशाल पाटील यांच्या अंतर्गत येणाऱ्या सावदा परिसरात किती अवैध धंदे सुरू आहेत.याबद्दलची जंत्रीही आमदार एकनाथराव खडसे यांनी वाचून दाखवली.
….. विषय संपला होता परंतु राजकीय व्यक्तींच्या पुष्टीमुळेच एफ.आय.आर. — आ. खडसे
दरम्यान त्या अधिकाऱ्यांशी बोलताना अडीच महिन्यात कारवाई का केली नाही असा प्रश्न विचारला असता,अडीच वर्षेही लागू शकतात असे त्या अधिकाऱ्याने उद्धटपणे बोलून एका लोकप्रतिनिधींचा अवमान केला. त्यामुळे मी म्हणालो की काहींनी शेण खाल्ले म्हणून तू गु खातो का ? असे म्हटले होते. परंतु ही माझी चूक झाली त्याबद्दल मी दोनदा माफी ही मागितली त्यामुळे तिथेच हा विषय संपला होता परंतु राजकीय व्यक्तींच्या गोष्टींमुळे माझ्यावर एफ आय आर दाखल झाली असे खडसे म्हणाले.
यावेळेस सावदा शहर व परिसरात कोणकोणते अवैध धंदे आहेत याचा पाढा वाचत आमदार खडसे म्हणाले की सावदा बस स्टँड जवळील कॉम्प्लेक्स च्या टेरेसवर पत्ता झन्ना मन्ना, हायस्कूल रोडवर साई मंदिरासमोर पीरखा मेंबर चा पत्त्याचा क्लब, कोथरूडवर गणपती मंदिराच्या मागे गुलाब झिरो या ठिकाणी पत्त्याचा क्लब, हॉटेल चंद्रमा येथे अवैध दारू विक्री होते, विशाल तायडे यांची सट्टा मटका पेढी आहे. तर सावखेडा येथे जयस्वाल यांची सट्टा मटका 14 स्टेशन रोडवर ढवा नावाच्या व्यक्तीचा क्लब गावात बहुतेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते सत्ता मटका आहेत इतकेच नाही तर गावातील प्रत्येक दुकानात गुटखा विक्री खुलेआम होत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला यातून महिन्याला सुमारे 50 लाख रुपये मिळत आहेत असा आरोपही आमदार खडसे यांनी केला इतकेच नव्हे तर सावदा येथील मर्चंट सोसायटी मधील सोने चांदी मिळालेली नाही या सोसायटीच्या प्रत्येक संचालका कडून पाच लाख रुपयाची मागणी केल्याची ही तक्रार त्यांच्या संचालकांनी आज माझ्याकडे येऊन केली आहे. ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना मात्र जेलमध्ये टाकल्याची तक्रारही आमदार खडसे यांच्याकडे करण्यात आल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले अशाप्रकारे एपीआय विशाल पाटील यांचे चरित्र असल्याने त्यांचे संपूर्ण रेकॉर्ड आता बाहेर काढणार असा इशाराही खडसे यांनी दिला . विशेष हक्क समितीकडे दाद मागणार असून पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे इतकेच नव्हे तर मानवाधिकार डीजीआयजी यांच्याकडेही पुरावे सादर करणार व तक्रार करणार असल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles