मुक्ताईनगर प्रतिनिधी….
मुक्ताईनगर तालुक्यातील तीन महसूल सेवक (कोतवाल )यांनी महसूल विभागातील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करीत शिपाई पदी पदोन्नती मिळवलेली आहे.
तिघांना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील कोतवाल प्रवीण सुभाष चिखलकर यांची जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, चारठाणा येथील कोतवाल सुधीर नामदेव खराटे यांची जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, चिखली येथील कोतवाल दिलीप प्रभाकर सावळे यांची तहसील कार्यालय पाचोरा येथे शिपाई पदी पदोन्नती झालेली आहे. अखेर
मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे , नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी प्रवीण चिखलकर ,सुनील खराटे ,दिलीप सावळे यांचे अभिनंदन केलेले आहे. पुढील वाटचालीस तहसीलदार गिरीश वखारे यांनी तिघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील 3 महसूल सेवकांची (कोतवाल) शिपाई पदी पदोन्नती.




