Top 5 This Week

Related Posts

भोसरी प्रकरणात खडसे दाम्पत्यांना कायदेशीररित्या न्यायालयात हजर राहावे लागणार. न्यायालयाने बजावला अजामीनपत्र वॉरंट.

मुक्ताईनगर प्रतिनिधी | भोसरी भूखंड
प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात गैरहजर राहिल्याने आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. दोघांना कायदेशीररित्या न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
पुणे येथील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी
मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी
खडसे यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने
बिगर जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात
शुक्रवारी आरोप निश्चितीची (Framing of charges) प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, खडसे पती-पत्नी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यांच्या वकिलांनी हजेरीतून सवलत मिळण्यासाठी दिलेला अर्ज न्यायालयाने “अस्पष्ट” असल्याचे सांगत फेटाळून लावला. हे वॉरंट ईडी (ED) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) या दोन्ही संबंधित प्रकरणांमध्ये जारी करण्यात आले आहे.
न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १२
फेब्रुवारी २०२६ रोजी ठेवली आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये विशेष न्यायालयाने खडसे
कुटुंबियांचा दोषमुक्ततेचा अर्ज (Discharge Plea)
फेटाळला होता आणि त्यांच्याविरुद्ध खटला
चालवण्याइतपत पुरेसा पुरावा असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर आता न्यायालयाने बिगर जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या वॉरंटमुळे आता खडसे कुटुंबियांना कायदेशीररीत्या न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे,
याविषयी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मुक्ताईनगर येथील त्यांचे फार्म हाऊस वर गेले असता त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगण्यात आले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles