मलकापुर :- तालुक्यातील मोरखेड दहा गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मलकापुर तालुक्यातील मोरखेड, दुधलगाव, लोणवडी,खामखेड, गौलखेड, आळंद, हरणखेड तसेच मोताळा तालुक्यातील न्हावी, दाभाडी, माकोडी या गावातील नागरिकांना मागील अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा केला जातो. वॉटर फ़िल्टर बसवा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या या मागणीसाठी आज दि.28 जुलै 26 रोजी युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे व माजी युवासेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर यांच्यासह जगदीश पाटील,विलास पाटील,चेतन पाटील,गणेश दिक्षीत,क्रिष्णा पाटील,गौरव ठोसर,ईश्वर झनके,लक्ष्मण भिस्ते आदि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवरच जनआंदोलन सुरु केले आहे. जो पर्यंत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी. या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अजय सावळे यांनी दुधलगाव येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता एक महिन्याच्या आत सर्व प्रकरणावर मार्ग निघून गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होईल असे लेखी आश्वासन पाणीपुरवठा अधिकारी यांनी दिले.
यावेळी आंदोलन करते गणेश सुशीर ,संजय झनके,गोविंदा झनके, अमोल झनके, अमोल भगत, मोहन शिरसाट, तर प्रशासनातर्फे ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी माने मॅडम, ग्रामसेवक अर्चना माहुरे, प्रशांसक यशवंत पाटील , आणि असंख्य गावकरी उपस्थित होते
