Homemuktainagarपुढील शैक्षणिक वर्षापासून मुक्ताईनगर शासकीय तंत्रनिकेतन सुरू होणार; आमदार एकनाथराव खडसेंच्या पाठपुराव्याला...

पुढील शैक्षणिक वर्षापासून मुक्ताईनगर शासकीय तंत्रनिकेतन सुरू होणार; आमदार एकनाथराव खडसेंच्या पाठपुराव्याला यश

-

पुढील शैक्षणिक वर्षापासून मुक्ताईनगर शासकीय तंत्रनिकेतन सुरू होणार; आमदार एकनाथराव खडसेंच्या पाठपुराव्याला यश

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

मुक्ताईनगर येथील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मंजूर असलेल्या नवीन शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) संस्थेची प्रतीक्षा आता संपणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही संस्था प्रत्यक्ष सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या असून, विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून पत्राद्वारे स्पष्टोक्ती
आमदार एकनाथराव खडसे यांनी ७ मार्च २०२५ रोजी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी लेखी पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, संस्थेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू व्हावेत या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बांधकाम आणि फर्निचरच्या कामाला गती
सध्या मुख्य इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम प्रगतीपथावर आहे. तसेच, अंतर्गत फर्निचर, विद्युत पुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे मार्ग मोकळा
इमारतीच्या एका भागाच्या बांधकामात रस्त्याचा तांत्रिक अडथळा येत होता. मात्र, आमदार खडसे यांच्या पुढाकारानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःहून आपली जमीन बक्षीस पत्राद्वारे हस्तांतरित केली आहे. यामुळे बांधकामातील सर्व अडथळे दूर झाले असून कामाचा वेग वाढला आहे.

पुढील शैक्षणिक सत्रात ही संस्था सुरू होणार असल्यामुळे मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शैक्षणिक स्वप्न आता साकार होत आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Related articles

Stay Connected

5,000FansLike
5,000FollowersFollow
5,000FollowersFollow
5,000SubscribersSubscribe
spot_img

Latest posts