मुक्ताईनगरात जेरबंद बिबट्याची जंगलात रवानगी

मुक्ताईनगर प्रतिनिधी :….. शहरातील बस स्थानकाजवळील शासकीय विश्रामगृह च्या संरक्षण भिंती जवळ मादी बिबट्याला मोठ्या कसरतीनंतर रविवारी ताब्यात घेतल्यानंतर आता पाल सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आलेले असल्याचे वनविभागाचे जिल्हा उपवनसंरक्षक श्री राम धोत्रे यांनी सांगितले.
त्याआधी त्याला 48 तास पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या निगराणीखाली विलगीकरण कक्षात ठेवत आरोग्य तपासणी करण्यात आली. बिबट्याला कुठेही दुखापत नव्हती. पचनशक्ती सशक्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबट्याला सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले.
मुक्ताईनगर येथे शासकीय विश्रामगृहातील आडोशाला २ वर्ष वयाची ही मादी बिबट लपलेली आढळून आली होती. विधानसभेचे लोकप्रतिनिधी व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला होता.



