Top 5 This Week

Related Posts

रुईखेडे येथे मोबाईल व्हॅन फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक शिबिर संपन्न.

रुईखेडे येथे मोबाईल व्हॅन फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक शिबिर संपन्न. ………..बालकांची तस्करी आणि बालकामगार, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य व पर्यायी विवाद निराकरण या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन .

मुक्ताईनगर । प्रतिनिधी ……….

उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती, औरंगाबाद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव

यांच्या निर्देशानुसार

तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मुक्ताईनगर यांचे संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडे या गावातील जिल्हा परिषद शाळेत दि. १० रोजी रोजी मोबाईल व्हॅन लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृतीपर शिबिर पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश बी.जी. पवार हे होते. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अरुण कांडेलकर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीकृष्ण दुट्टे, वकील संघाचे सदस्य ॲड. जगदीश निकम, सचिन सुरवाडे, ग्रामसेवक दिपक कोसोदे, गावातील नागरिक , मुक्ताईनगर न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक किशोर एस. पिंगाणे, वरिष्ठ लिपिक एन. आर. राजहंस, कनिष्ठ लिपिक कुणाल पी. वाघ, बेलीफ व्ही. बी. बारी, शिपाई तुषार निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश बी.जी.पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. देवेंद्र बोदडे यांनी बालकामगार आणि बालकांची तस्करी या विषयावर, ॲड. अशोक बोदडे यांनी नागरिकांचे मूलभूत कर्तव्य, ॲड. एल. एन. पुजारी यांनी पर्यायी विवाद निराकरण या विषयांवर कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संतोष टी. कोळी व आभार ॲड. राहुल लहासे यांनी मानले. यावेळी सदर मोबाईल व्हॅन लोक न्यायालयाच्या पॅनलचे पंच सदस्य म्हणून ॲड. डी. एस. काळे व यु. आर. जवरे हे होते. तसेच या मोबाईल व्हॅन लोक न्यायालय व कायदेविषयक शिबिरास विद्यार्थी व गांवकरी उपस्थित होते.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles