Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची महत्त्वाची बैठक; संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा.

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने आपली कंबर कसली असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काल खडसे फार्म, मुक्ताईनगर येथे एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मतदार यादी नियोजन आणि प्रत्येक बूथ स्तरावर BLO (बी.एल.ओ.) नेमणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे उपस्थित होते. त्यांच्यासोबतच जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष यू. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

या बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये बोदवड तालुकाध्यक्ष प्रशांत (आबा) पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, निवृत्ती पाटील, भाऊराव पाटील , रामदास पाटील, विलास देवकर, डॉ. ए. एन. काजळे, शहराध्यक्ष राजु माळी, उपाध्यक्ष विकास पाटील, सरपंच डॉ. बी. सी. महाजन, माजी सभापती विलास धायडे यांचा समावेश होता.

बैठकीच्या शेवटी, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्र पवार यांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles