Top 5 This Week

Related Posts

आई-वडिलांच्या कष्टाचे सोनं फुललं : कोचुरचा हर्षल पाटील झाला राज्य कर सहाय्यक अधिकारी.

आई-वडिलांच्या कष्टाचे सोनं फुललं : कोचुरचा हर्षल पाटील झाला राज्य कर सहाय्यक अधिकारी.

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

रावेर तालुक्यातील कोचुरसारख्या छोट्याशा गावात जन्मलेला हर्षल पाटील आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर विभागातील राज्य कर सहाय्यक अधिकारी (टॅक्स असिस्टंट) म्हणून निवडला गेला आहे आणि या बातमीने संपूर्ण परिसरात अभिमानाची लहर उसळली आहे. पण या यशाचा खरा पाया आहे—त्याची जिद्द, त्याची धडपड आणि त्याच्या आई-वडिलांनी केलेला खडतर संघर्ष होय.
गरिब परिस्थितीतून उभं राहणं सोपं नसतं. घरात तुटपुंज्या सोयी, कष्टमय जीवन, अभ्यासासाठी शांत वातावरण नसतानाही हर्षल पाटील यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यात जपले. त्याच्या क्षमतेवर आणि अभ्यासावर त्याहून अधिक विश्वास होता त्याच्या आई-वडिलांचा. या कुटुंबाची जिद्द म्हणजे माणसाला प्रेरणा देणारी जिवंत कहाणीच आहे.
वडील वसंता झगु पाटील (देवरे) मजुरी करून घर चालवत होते. उन्हा-पावसात राबत, हातावर फोड आले तरी न थांबता त्यांनी एकच ध्येय मनात ठेवले—“माझा मुलगा शिकला पाहिजे… अधिकारी झाला पाहिजे.”
दुसरीकडे आई प्रमिला पाटील यांनी स्वतःच्या गरजा, इच्छा, सुखसोयी मागे सारल्या आणि मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटत राहिल्या.
कष्टांच्या पर्वतरांगांवरून मार्ग काढत, अडचणींच्या दरीत न खचता, हर्षल पाटील अखेर यशाच्या शिखरावर पोहोचले. निवड झाल्याची बातमी कळताच घरभर अवर्णनीय आनंद पसरला.
आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नव्हते—ते समाधानाचे, सार्थकतेचे आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या कष्टांना मिळालेल्या वरदानाचे होते.
वडिलांच्या डोळ्यातही चमक दिसत होती. आयुष्यभर मजुरी करून थकलेले हात आज केवळ अभिमानाने थरथरत होते.
त्यांचा मुलगा अधिकारी झाला… त्यांच्या स्वप्नांना पंख फुटले… त्यांच्या वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचे सोने झाले.
कोचुर सारख्या छोट्या गावातून एक अधिकारी घडणे म्हणजे फक्त एका व्यक्तीचे यश नाही—ते संपूर्ण कुटुंबाचे, आई-वडिलांच्या रक्त-घामाच्या त्यागाचे आणि समाजाला ऊर्जा देणारे जिवंत उदाहरण आहे असे लेखक छबिलदास पाटील उचंदा मुक्ताईनगर कळवतात.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles